सोमवार, ५ एप्रिल, २०१०

टॅटू शौकिनांसाठी टॅटमॅश

टॅटू गोंदवण्याची आवड असणार्‍यांसाठी आज मी एक उपयुक वेबसाइट सुचवणार आहे.
हि वेबसाइट आहे  http://tatmash.com/

टॅटू गोंदवून घेण्याअगोदर तो टॅटू तुमच्या शरीरावर कसा दिसेल हे जर अगोदरच कळले तर? नेमके हेच तुम्हाला या वेबसाइट वर पाहायला मिळेल. या वेबसाइटवर रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही. बस्स तुम्हाला हवा तो टॅटू लायब्ररीमधून निवडा, तुमचा फोटो अपलोड करा आणि त्यानंतर फोटोमध्ये योग्य त्या जागी टॅटू मूव्ह करून फ्लॉपी डिस्क सदृश बटणावर क्लिक करून रिझल्ट पाहा. यात तुम्ही टॅटू लहान-मोठा किंवा उलट-सुलट देखील करू शकता.









टॅटू शौकिनांसाठीतर हि वेबसाइट म्हणजे खास पर्वणीच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा