सोमवार, २६ एप्रिल, २०१०

स्वरभास्कराच्या स्वरांचा अमूल्य ठेवा

भारतरत्न स्वरभास्क पं. भीमसेन जोशी यांच्या संगीताचा अमूल्य ठेवा एका हौशी श्रोत्याने इंटरनेटवर उपलब्ध करून दिला आहे. पंडितजींच्या चाहत्यांसाठी तर ही खास पर्वणीच आहे. कूण ८९ फोल्डर मध्ये मिळून निवडक २३५ गीते mp3 स्वरुपात संग्रहीत केली आहेत. हा अमूल्य ठेवा जीबी पेक्षाही अधिक क्षमतेचा आहे.






हा संग्रह तुम्ही खालील लिंकवरुन एकदम फुकट डाऊनलोड करू शकता.
http://www.mediafire.com/?sharekey=fb6bb67329a4e8b44012e8015643d9c84d67f51a0e9b47a6

पंडितजींबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

शुक्रवार, १६ एप्रिल, २०१०

लोकप्रभा साप्ताहिक २३ एप्रिल २०१०

 

pdf डाउनलोड लोकप्रभा साप्ताहिक २३ एप्रिल २०१०

Acrobat Reader ओपन करा नोटपॅडच्या गतीने

 

काय! शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना ? हो! हे शक्य आहे.
तुम्ही कधी विचार केला आहे की अॅडो अॅक्रोबॅट रिडर ओपन व्हायला इतका वेळ का लागतो?
कारण तो ओपन होताना सर्वाधिक मेमरी खातोयामागचं कारण की तो ओपन होताना आवश्यक अनावश्यक असे सर्व प्लगीन्स (Plugins) देखील लोड करतो. हे टाळण्यासाठी ट्रिक अशी आहे की हे सर्व प्लगीन्स उचलून दुसरीकडे कुठेतरी हलवायचे.

सर्वप्रथम अॅडो अॅक्रोबॅट रिडर ओपन असेल तर तो बंद करा. त्यानंतर

. अॅक्रोबॅट रिडरच्या इनस्टॉले फोल्डर मध्ये जा.
उदा. (C:\program files\adobe\acrobat\reader\.. )
. "Plugins" हा फोल्डर ओपन करा  त्यामधील सर्व फाइल्स सिलेक्ट करून त्या कट करा (कॉपी नव्हे) डेस्कटॉपवर किंवा इतर कुटेही एक नवीन फोल्डर बनवून त्यामध्ये पेस्ट करा.
  
आता अॅक्रोबॅट रिडर ओपन करा  पाहा तो नोटपॅडच्या गतीने पळतो की नाही ते.
आणि हो! मला रिप्ला द्यायला मात्र विसरू नका.

मंगळवार, १३ एप्रिल, २०१०

अन्नयोग : मध


मधाला संस्कृतमध्ये 'मधु' म्हणतात. नावावरूनच त्याची मधुरता लक्षात येते. चरकसंहितेमध्ये मधाचे चार प्रकार सांगितले आहेत. सुश्रुतसंहिता, निघण्टु रत्नाकर वगैरे ग्रंथांत तर आठ प्रकार सांगितले आहेत.

ऊस, गूळ, साखर वगैरे गोड पदार्थांची माहिती आपण पाहिली. आज आपण नैसर्गिक मधुर पदार्थांची माहिती घेणार आहोत. मधाला संस्कृतमध्ये "मधु' म्हणतात. नावावरूनच त्याची मधुरता लक्षात येते. चरकसंहितेमध्ये मधाचे चार प्रकार सांगितले आहेत. सुश्रुतसंहिता, निघण्टु रत्नाकर वगैरे ग्रंथांत तर आठ प्रकार सांगितले आहेत. खऱ्या, शुद्ध मधाचे गुणधर्म याप्रमाणे सांगितले आहेत-

बुधवार, ७ एप्रिल, २०१०

जुनी मराठी पुस्तके

मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल. बाकी इतर भाषेतील पुस्तकांपेक्षा मराठी पुस्तकं सर्वाधिक आहेत.
१) http://www.new.dli.ernet.in/
2) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIISc.html
३) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIIIT.html
४) http://sanskritdocuments.org/scannedbooks/

 प्रस्तुत लेख www.maayboli.com या वेबसाइटवरुन जशास तसा  घेतला आहे.

सोमवार, ५ एप्रिल, २०१०

टॅटू शौकिनांसाठी टॅटमॅश

टॅटू गोंदण्याची आवड असणार्‍यांसाठी आज मी एक उपयुक वेबसाइट सुचवणार आहे.
हि वेबसाइट आहे  http://tatmash.com/

टॅटू गोंदवून घेण्याअगोदर तो टॅटू तुमच्या शरीरावर कसा दिसेल हे जर अगोदरच कळले तर? नेमके हेच तुम्हाला या वेबसाइट वर पाहायला मिळेल. या वेबसाइटवर रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही. बस्स तुम्हाला हवा तो टॅटू लायब्ररीमधून निवडा, तुमचा फोटो अपलोड करा आणि त्यानंतर फोटोमध्ये योग्य त्या जागी टॅटू मूव्ह करून फ्लॉपी डिस्क सदृश बटणावर क्लिक करून रिझल्ट पाहा. यात तुम्ही टॅटू लहान-मोठा किंवा उलट-सुलट देखील करू शकता.









टॅटू शौकिनांसाठीतर हि वेबसाइट म्हणजे खास पर्वणीच आहे.

गुरुवार, १ एप्रिल, २०१०

फायरफॉक्स टॅब ब्राउसिंगचा एक नवा अनुभव

फायरफॉक्समध्ये एकावेळी अनेक टॅब ओपन करणारे माझ्यासारखे तुम्हीदेखील एक असाल तर आजची टिप तुम्हाला फायरफॉक्स टॅब ब्राउसिंगचा एक नवा अनुभव देईल यात शंकाच नाही.

फायरफॉक्समध्ये अनेक टॅब ओपन असताना एका टॅबमधून दुसर्‍या टॅब मध्ये जाण्यासाठी तुम्ही काय करता? एका-एका टॅबवर क्लिक करता की कीबोर्डवरील Ctrl+Tab हा नेहमीचा शॉर्टकट वापरता? हा शॉर्टकट वापरत नसाल तर आता तो वापरण्याची सवय लावा कारण तुम्ही आता या शॉर्टकटद्वारे ओपन असलेल्या टॅबचा अगोदरच प्रीव्ह्यू एका छोट्या विंडोमध्ये पाहु शकाल.
चला मग! पाहुया हे कसे शक्य आहे ते.