फायरफॉक्समध्ये एकावेळी अनेक टॅब ओपन करणारे माझ्यासारखे तुम्हीदेखील एक असाल तर आजची टिप तुम्हाला फायरफॉक्स टॅब ब्राउसिंगचा एक नवा अनुभव देईल यात शंकाच नाही.

प्रथम फायरफॉक्स ब्राउसर ओपन करा व अॅड्रेसबारमध्ये about:config असे टाइप करा.
यानंतर फायरफॉक्सने दिलेल्या सेक्युरीटी वॉर्निंगकडे दुर्लक्ष करून "I'll be careful, I promise" वर क्लिक करा.
आता खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे फायरफॉक्स कॉनफिग्रेशन पेज ओपन होईल. त्यामध्ये browser.ctrlTab.previews हि एण्ट्री शोधा व false वर डबल क्लिक करून ती true अशी बदला. यानंतर फायरफॉक्स रीस्टार्ट करा.
आता जेव्हा जेव्हा तुम्ही एका पेक्षा अधिक टॅब्स ओपन कराल तेव्हा Ctrl+Tab हा शॉर्टकट वापरल्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे प्रत्येक टॅबचा प्रीव्ह्यू एका छोट्या विंडोमध्ये दिसेल.
तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका.
Happy Browsing !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा