सोमवार, २६ एप्रिल, २०१०

स्वरभास्कराच्या स्वरांचा अमूल्य ठेवा

भारतरत्न स्वरभास्क पं. भीमसेन जोशी यांच्या संगीताचा अमूल्य ठेवा एका हौशी श्रोत्याने इंटरनेटवर उपलब्ध करून दिला आहे. पंडितजींच्या चाहत्यांसाठी तर ही खास पर्वणीच आहे. कूण ८९ फोल्डर मध्ये मिळून निवडक २३५ गीते mp3 स्वरुपात संग्रहीत केली आहेत. हा अमूल्य ठेवा जीबी पेक्षाही अधिक क्षमतेचा आहे.






हा संग्रह तुम्ही खालील लिंकवरुन एकदम फुकट डाऊनलोड करू शकता.
http://www.mediafire.com/?sharekey=fb6bb67329a4e8b44012e8015643d9c84d67f51a0e9b47a6

पंडितजींबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

शुक्रवार, १६ एप्रिल, २०१०

लोकप्रभा साप्ताहिक २३ एप्रिल २०१०

 

pdf डाउनलोड लोकप्रभा साप्ताहिक २३ एप्रिल २०१०

Acrobat Reader ओपन करा नोटपॅडच्या गतीने

 

काय! शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना ? हो! हे शक्य आहे.
तुम्ही कधी विचार केला आहे की अॅडो अॅक्रोबॅट रिडर ओपन व्हायला इतका वेळ का लागतो?
कारण तो ओपन होताना सर्वाधिक मेमरी खातोयामागचं कारण की तो ओपन होताना आवश्यक अनावश्यक असे सर्व प्लगीन्स (Plugins) देखील लोड करतो. हे टाळण्यासाठी ट्रिक अशी आहे की हे सर्व प्लगीन्स उचलून दुसरीकडे कुठेतरी हलवायचे.

सर्वप्रथम अॅडो अॅक्रोबॅट रिडर ओपन असेल तर तो बंद करा. त्यानंतर

. अॅक्रोबॅट रिडरच्या इनस्टॉले फोल्डर मध्ये जा.
उदा. (C:\program files\adobe\acrobat\reader\.. )
. "Plugins" हा फोल्डर ओपन करा  त्यामधील सर्व फाइल्स सिलेक्ट करून त्या कट करा (कॉपी नव्हे) डेस्कटॉपवर किंवा इतर कुटेही एक नवीन फोल्डर बनवून त्यामध्ये पेस्ट करा.
  
आता अॅक्रोबॅट रिडर ओपन करा  पाहा तो नोटपॅडच्या गतीने पळतो की नाही ते.
आणि हो! मला रिप्ला द्यायला मात्र विसरू नका.

मंगळवार, १३ एप्रिल, २०१०

अन्नयोग : मध


मधाला संस्कृतमध्ये 'मधु' म्हणतात. नावावरूनच त्याची मधुरता लक्षात येते. चरकसंहितेमध्ये मधाचे चार प्रकार सांगितले आहेत. सुश्रुतसंहिता, निघण्टु रत्नाकर वगैरे ग्रंथांत तर आठ प्रकार सांगितले आहेत.

ऊस, गूळ, साखर वगैरे गोड पदार्थांची माहिती आपण पाहिली. आज आपण नैसर्गिक मधुर पदार्थांची माहिती घेणार आहोत. मधाला संस्कृतमध्ये "मधु' म्हणतात. नावावरूनच त्याची मधुरता लक्षात येते. चरकसंहितेमध्ये मधाचे चार प्रकार सांगितले आहेत. सुश्रुतसंहिता, निघण्टु रत्नाकर वगैरे ग्रंथांत तर आठ प्रकार सांगितले आहेत. खऱ्या, शुद्ध मधाचे गुणधर्म याप्रमाणे सांगितले आहेत-

बुधवार, ७ एप्रिल, २०१०

जुनी मराठी पुस्तके

मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल. बाकी इतर भाषेतील पुस्तकांपेक्षा मराठी पुस्तकं सर्वाधिक आहेत.
१) http://www.new.dli.ernet.in/
2) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIISc.html
३) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIIIT.html
४) http://sanskritdocuments.org/scannedbooks/

 प्रस्तुत लेख www.maayboli.com या वेबसाइटवरुन जशास तसा  घेतला आहे.

सोमवार, ५ एप्रिल, २०१०

टॅटू शौकिनांसाठी टॅटमॅश

टॅटू गोंदण्याची आवड असणार्‍यांसाठी आज मी एक उपयुक वेबसाइट सुचवणार आहे.
हि वेबसाइट आहे  http://tatmash.com/

टॅटू गोंदवून घेण्याअगोदर तो टॅटू तुमच्या शरीरावर कसा दिसेल हे जर अगोदरच कळले तर? नेमके हेच तुम्हाला या वेबसाइट वर पाहायला मिळेल. या वेबसाइटवर रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही. बस्स तुम्हाला हवा तो टॅटू लायब्ररीमधून निवडा, तुमचा फोटो अपलोड करा आणि त्यानंतर फोटोमध्ये योग्य त्या जागी टॅटू मूव्ह करून फ्लॉपी डिस्क सदृश बटणावर क्लिक करून रिझल्ट पाहा. यात तुम्ही टॅटू लहान-मोठा किंवा उलट-सुलट देखील करू शकता.









टॅटू शौकिनांसाठीतर हि वेबसाइट म्हणजे खास पर्वणीच आहे.

गुरुवार, १ एप्रिल, २०१०

फायरफॉक्स टॅब ब्राउसिंगचा एक नवा अनुभव

फायरफॉक्समध्ये एकावेळी अनेक टॅब ओपन करणारे माझ्यासारखे तुम्हीदेखील एक असाल तर आजची टिप तुम्हाला फायरफॉक्स टॅब ब्राउसिंगचा एक नवा अनुभव देईल यात शंकाच नाही.

फायरफॉक्समध्ये अनेक टॅब ओपन असताना एका टॅबमधून दुसर्‍या टॅब मध्ये जाण्यासाठी तुम्ही काय करता? एका-एका टॅबवर क्लिक करता की कीबोर्डवरील Ctrl+Tab हा नेहमीचा शॉर्टकट वापरता? हा शॉर्टकट वापरत नसाल तर आता तो वापरण्याची सवय लावा कारण तुम्ही आता या शॉर्टकटद्वारे ओपन असलेल्या टॅबचा अगोदरच प्रीव्ह्यू एका छोट्या विंडोमध्ये पाहु शकाल.
चला मग! पाहुया हे कसे शक्य आहे ते.

शनिवार, २७ मार्च, २०१०

फिंगरप्रिंट स्कॅनर USB फ्लॅश ड्राइव्ह

फ्लॉपी, सीडी नंतर डाटा सेव्ह करण्यासाठी सध्या जमाना आहे USB फ्लॅश ड्राइव्हचा. आणि अशावेळी प्रश्न उभा राहतो तो आपल्या डाटा सेक्युरीटिचा. पासवर्ड देऊन USB फ्लॅश ड्राइव्ह सुरक्षित करणे हा सर्वश्रुत प्रकार आहे पण त्याहीपुढे जाऊन सुरक्षिततेचा नवा प्रकार येऊ घातला आहे तो म्हणजे फिंगरप्रिंट USB स्कॅनर फ्लॅश ड्राइव्ह. हे विशिष्ट प्रकारचे USB फ्लॅश ड्राइव्ह आहेत की जे तुमच्या बोटांच्या शांचा उपयोग करून सुरक्षित करता येतील. यामध्ये बिल्ट-इन फिंगरप्रिंट स्कॅनर असेल.
यामधील डाटा access करण्यासाठी USB फ्लॅश ड्राइव्हवर असलेल्या फिंगरप्रिंट रीडरने प्रथम तुमच्या बोटांचे से पडताळण्यात येतील.
यात तुम्ही जीबी पासून १६ जीबी पर्यंत डाटा सेव्ह करू शकता.








Technical Specifications:
Supports Windows 2000, XP
Disk Memory Capacity: 16GB (7.79GB secure data, 7.11GB non-secure)
USB 2.0 Connection Interface
USB: 2.0 (backward compatible with 1.1)
Scanner Dimensions: 11mm x 26mm x 76mm (H x W x L)
Scanner Resolution: 500 DPI with Field Size of 124 x 8 pixels
Scanning Speed: 1 second
Matching Speed: < 10ms

फेसबुकवरील व्हायरस

फेसबुक हे लोकप्रिय सोशल नेटवर्क नुकत्याच एका व्हायरसच्या आक्रमणातू सावरत आहेफेसबुकच्या काही युजरना एक ईमेल आला होता ज्यात असे लिहिले होते की या युजर्सनी पासवर्ड चेंज करण्याविषयी रिकवेस्ट पाठवली होती आणि त्यांचा पासवर्ड ईमेल मध्ये अटॅच केला आहे. हे ईमेल help@facebook.com इथून आल्याचे भासविण्यात आले होते. फेसबुकला या व्हायरसबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या युजर्सना अशा प्रकारचा ईमेल आल्यास त्याकडे दुर्लक्ष करून डिलीट करण्यास सांगितले.

रशियन सरकारचा नवीन नियम

सर्वाधिक स्पॅम आणि फ्रॉड ईमेल्स हे रशियामधून येतात हे जवळपास सर्वांनाच माहीत आहे. यावर उपाय म्हणून रशियन सरकारने एक नवीन नियम काढला आहे.  एप्रिल २०१० पासून जे कोणी .ru हे domain रजिस्टर करतील त्यांना त्यांच्या पासवर्डची एक प्रत ओळख पडताळणीसाठी द्यावी लागेल. .ru हे रशियातील उच्च पातळीचे domain आहे; जसे भारतात .in हे उच्च पातळीचे domain आहे.
रशियन सरकारला आशा आहे की या नवीन नियमामुळे .ru या domain वरुन पसरणारे स्पॅम, फ्रॉड यासारखे इंटरनेटवरील गैरप्रकार कमी होतील.
यापूर्वी .ru या domain वर रजिस्टर करताना ओळख पडताळणीची कोणतीही सुविधा नव्हती आणि याचा गैरफायदा घेऊन स्पॅमर  हॅक आपली खरी ओळख लपवायचे.

मंगळवार, २३ मार्च, २०१०

Icons चा खजिना

इंटरनेटवर नेहमीप्रमाणे फेर-फटका मारताना मला एक उपयुक्त अशी वेबसाइट सापडली आणि आज मी त्या वेबसाइटचा परिचय तुम्हाला करून देणार आहे.
काही दिवसापूर्वी मी एका ठराविक आयकॉनच्या शोधत होतो. गूगलवर सर्च करून देखील मनासारखे icon काही मिळत नव्हते आणि आज अचानक  काहीतरी सर्च करताना या वेबसाइटवर जाऊन पोहोचलोया वेबसाइटचे नाव आहे www.findicons.com इथे चक्क icons चा खजिना आहे आणि या खजिन्यात आहेत जवळपास लाख icons.

मी शोधत असलेले आयकॉन येथे मला मिळाले. तुम्हाला जर नेहमीच्या विंडोजच्या icons चा कंटाळा आला असेल तर या वेबसाइट वरुन तुमच्या पसंदीचे आयकॉन तुम्ही ICO, ICNS किवा PNG या फॉरमॅमध्ये डाउनलोड करू शकता. उदा. मायकॉम्प्यूटरचे आयकॉन किंवा फोल्डर, प्रिंटरवर्डएक्स्सेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे आयकॉन तुम्हाला येथे सापडेल. या वेबसाईटच्या निर्मात्यांचा दावा आहे की त्यांच्याइतका आयकॉनचा साठा जगात कुणाकडेच नाही आणि तोही फुकट.

 











मग तुम्ही स्वतः खात्री करुन घ्या आणि निवडा तुमच्या पसंदीचे आयकॉन.

शनिवार, २० मार्च, २०१०

अन्नयोग : पनीर, चीज, चक्का


दूध हे सर्वोत्तम असते. दुधाला काहीही पर्याय असू शकत नाही, अगदी दुधापासून केलेले पदार्थही.

दुधापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात; पण संस्कारांनुसार या सर्व पदार्थांचे गुण वेगवेगळे असतात. बऱ्याचदा दुधाचा पर्याय म्हणून दुधापासून केलेले पदार्थ खाल्ले जातात; परंतु दूध हे सर्वोत्तम असते. दुधाला काहीही पर्याय असू शकत नाही. आज आपण पनीर, चीज वगैरे पदार्थांच्या गुणदोषांची माहिती करून घेणार आहोत.

पनीर
"पनीर' हा पदार्थ प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला दिसतो. सध्याही भाजी, भजी वगैरे बनविण्यासाठी पनीर मोठ्या प्रमाणावर वापरला जाते.
क्षीरकूर्चिकापिण्डः कूर्चिकीभूतक्षीरस्य घनभागः ।
...सुश्रुत सूत्रस्थान
दुधात आंबट घातल्यानंतर दूध फाटते. यातील घट्ट भागातील पाणी काढून टाकले की पनीर तयार होते.

फोटो रिसाइज करा एका क्लिकमध्ये

डिजिटल कॅमेर्‍याचा शोध लागल्यापासून तसेच मोबाइलमध्ये कॅमेरा आल्यापासून हल्ली प्रत्येकजण फोटोग्राफर झाला आहे व प्रत्येकाकडे स्वतःचा असा डिजिटल फोटोंचा संग्रह कॉम्प्यूटर मध्ये असतो. बर्‍याचदा या फोटोंची फाईल साइज खूप मोठी असते. कारण फोटो काढताना ते High Resolution वर सेट करून काढलेले असतात. प्रत्येक फोटोची साइज जवळपास १ एमबी पासून २ किंवा २.५ एमबी एवढी विशाल असु शकते.

आता यातील काही फोटो किंवा सर्व फोटो जेव्हा तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींना, लगतच्या नातेवाईकांना ईमेलने पाठवायचे असतात किवा फेसबुक, ओरकूट यासारख्या सोशल नेटवर्क मध्ये अपलोड करायचे असतात तेव्हा मात्र तुमची गोची होते. कारण एवढ्या मोठ्या साइजच्या फाइल्स ईमेलवर अटॅच करणे म्हणजे केवळ वेळखाऊ प्रक्रिया आहे. तसेच सोशल नेटवर्कवर सुद्धा फोटो अपलोड करण्यासाठी फाईल साइज अमुक एक मर्यादेची असावी लागते.

तेव्हा तुम्ही कदाचित विचार केला असेल की एवढ्या सर्व फोटोंची फाईल साइज एका चुटकीसरशी कमी करता आली तर?
हो! हे शक्य आहे. आणि आज मी त्याबद्दलच सांगणार आहे.

मंगळवार, १६ मार्च, २०१०

BullZip PDF Printer

तुम्ही कधी एखादी वर्डएक्स्सेलपावरपॉइण्ट किवा इतर कोणत्याही प्रकारची डॉक्यूमेंट PDF मध्ये प्रिंट केली आहेकाय? नाही.....?

पण आता मात्र तुम्ही तुमच्या डॉक्यूमेंटस् PDF मध्ये प्रिंट करू शकता. यासाठी तुम्हाला डाउनलोड करावा लागेल BullZip PDF प्रिंटर.
या प्रिंटरच्या शोधकर्त्यांनी तो वापरण्यासाठी एकदम फुकट ठेवला आहे.

खाली दिलेल्या लिंकवरुन तुम्ही तो डाउनलोड करू शकता.

डाउनलोड झाल्यावर इनस्टॉल करा.
कंट्रोल पॅनेलमध्ये जाऊन प्रिंटरमध्ये पाहिल्यास तिथे तुम्हाला आता BullZip PDF प्रिंटर add झालेला दिसेल.







 

आता उदा. एखादी वर्ड किंवा एक्स्सेल डॉक्यूमेंट ओपन करा  प्रिंट बटणावर क्लिक करा.
खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे BullZip PDF Printer सिलेक्ट करा.

शनिवार, १३ मार्च, २०१०

अमेरिकेने नाकारले ते आपण स्वीकारले भाग - २

प्रस्तुत लेख दैनिक लोकसत्ता मधून जशास तसा घेतला आहे.

अ‍ॅड. गिरीश वि. राऊत , गुरुवार, १८ फेब्रुवारी २०१०
उत्तरार्ध





 प्रगत देशांतील अहवाल, आंदोलने यांनी अणुऊर्जेला नाकारले. अनेक ठिकाणी अणुभट्टया बंद करण्यात आल्या. आपल्याकडे मात्र अणुऊर्जा आयोगासारख्या अनेक सरकारी यंत्रणा घातक सत्य दडपण्यातच धन्यता मानतात. आण्विक हानीपासून रक्षण करणारी व्यवस्था अस्तित्वातच नाही.
अणुवीज सर्वात महाग असली तरी ती स्वस्त असल्याचा भ्रम अणुउद्योग आणि सरकारे पसरवितात. परंतु मॅसाच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे की, अणुवीज कोळसा वा वायूपेक्षा सुमारे ६० टक्क्यांनी महाग आहे. आयात केलेल्या अणुभट्टीच्या विजेचा दर तर दुपटीने महाग आहे. वीजनिर्मितीचा प्रति मेगावॉट भांडवली खर्च तक्ता पाहता स्पष्ट होईल.
अणुकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा खर्च, फक्त दुर्घटनेचा विमा व छुपे खर्च आणि अनुदाने धरली तर अणुवीज याहून खूप महाग होते. शिवाय सुमारे २४० हजार वर्षे वा त्यापेक्षा जास्त काळ किरणोत्सारी द्रव्ये, पर्यावरण

अनावश्यक विकासाचा विध्वंसक महाभ्रम भाग - १

प्रस्तुत लेख दैनिक लोकसत्ता मधून जशास तसा घेतला आहे.

अ‍ॅड. गिरीश वि. राऊत , बुधवार, १७ फेब्रुवारी २०१०
पूर्वार्ध



ऊर्जेची गरज भासवून अणुप्रकल्प आणण्याची घाई अनाठायी आहे. अणुप्रकल्पांचे घातक परिणाम अनुभवलेल्या अमेरिकेत यापूर्वीच कित्येक प्रकल्प बंद करण्यात आले आहेत. या वस्तुस्थितीकडे साफ दुर्लक्ष करणे म्हणजे मानवी अस्तित्त्वाची कबर खोदण्यासारखे आहे..
अणुऊर्जा स्वच्छ, सुरक्षित, पर्यावरणस्नेही आहे, असा प्रचार अणुशक्ती महामंडळ सातत्याने करते. यातून कार्बन उत्सर्जन होत नाही म्हणून तापमानवाढीच्या पाश्र्वभूमीवर अणुऊर्जा हा चांगला पर्याय असल्याचे प्रतिपादन केले जाते. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. अणुशक्तीपासून वीज ही दीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यास अणुइंधन चक्र म्हणतात. यातील प्रत्येक टप्प्यावर कोळसा, तेल व वायू ही खजिज इंधने मोठय़ा प्रमाणावर जाळली जातात. खाणीतून युरेनियमचे खनिज काढणे आणि त्याचे चूर्ण बनविणे, त्या चूर्णाचे

विंडोज मीडिया प्लेयरमध्ये स्क्रीनशॉट कसा कॅपचर कराल?

तुम्ही कधी विंडोज मीडिया प्लेयर मध्ये विडीयो चालू असताना एखादा आवडलेला सीन कॅपचर करून तो पेंट-ब्रश किंवा तत्सम एखाद्या फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये पेस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे का? तर इतरांप्रमाणे तुमचादेखील हिरमोड झाला असेल. कारण पेस्ट केल्यानंतर विडीयोच्या जागी फक्त एका काळ्या चौकोनाव्यतिरिक्त तुमच्या हाती काहीच लागले नसेल. तुम्ही कदाचित पुन्हा प्रयत्न कराल पण शेवटी परिणाम तोच.

तसे पाहिल्यास विडीयो मधून एखादा स्क्रीन कॅपचर करण्यासाठी विशिष्ट प्रकारची कमर्शियल सॉफ्टवेअर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण त्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा किंवा एखादे सॉफ्टवेअर डाउनलोड करता ही समस्या सोडवता आली तर?

आजची टिप तुमची ही समस्या चुटकीसरशी सोडवेल.
ही समस्या दोन प्रकारे सोडवता येईल. दोन्ही प्रकार मी इथे सांगणार आहे.
पाहुया पहिला प्रकार Overlays

प्रथम विंडोज मीडिया प्लेयर ओपन करून Tools वर क्लिक करून नंतर Options वर क्लिक करा.
. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे Options मधील Performance टॅब ओपन करून Advanced वर क्लिक करा.



















 



. आता Video Acceleration Settings या नावाचा विंडो ओपन होईल.त्यामध्ये फक्त Use overlays च्या बाजूला असलेल्या छोट्या चौकोनातील टिक मार्क काढून टाका ओके वर क्लिक करुन तो विंडो बंद करा.





















बस्स! आता तुम्ही विंडोज मीडिया प्लेयरमध्ये विडीयो प्ले करून तुम्हाला हवा तो सीन कीबोर्डवरील Print Screen दाबून अक्ख्या डेस्कटॉपसक कॉपी करू शकता किंवा Alt + Print Screen दाबून फक्त विंडोज प्लेयरचा विंडो, विडीयोफ्रेमसक कॉपी करू शकता.























आता पाहुया दुसरा प्रकार.

यामध्ये Overlays काढून टाकता फक्त Video Acceleration काढून टाकून पहिल्या प्रकाराप्रमाणेच परिणाम साधता येईल.

मघाशी दाखविल्याप्रमाणे Options मधील Performance टॅब ओपन करा. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे
जिथे Video Acceleration लिहिले असेल तिथला स्लाइडर "Full" वरुन "none" वर आणून ठेवा ओके वर क्लिक करुन तो विंडो बंद करा.























मग झालेतर..
आता तुम्ही विंडोज मीडिया प्लेयरमध्ये स्क्रीनशॉट कॅपचर करू शकता.
ही टिप कशी वाटली? तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा.