शनिवार, २० मार्च, २०१०

फोटो रिसाइज करा एका क्लिकमध्ये

डिजिटल कॅमेर्‍याचा शोध लागल्यापासून तसेच मोबाइलमध्ये कॅमेरा आल्यापासून हल्ली प्रत्येकजण फोटोग्राफर झाला आहे व प्रत्येकाकडे स्वतःचा असा डिजिटल फोटोंचा संग्रह कॉम्प्यूटर मध्ये असतो. बर्‍याचदा या फोटोंची फाईल साइज खूप मोठी असते. कारण फोटो काढताना ते High Resolution वर सेट करून काढलेले असतात. प्रत्येक फोटोची साइज जवळपास १ एमबी पासून २ किंवा २.५ एमबी एवढी विशाल असु शकते.

आता यातील काही फोटो किंवा सर्व फोटो जेव्हा तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींना, लगतच्या नातेवाईकांना ईमेलने पाठवायचे असतात किवा फेसबुक, ओरकूट यासारख्या सोशल नेटवर्क मध्ये अपलोड करायचे असतात तेव्हा मात्र तुमची गोची होते. कारण एवढ्या मोठ्या साइजच्या फाइल्स ईमेलवर अटॅच करणे म्हणजे केवळ वेळखाऊ प्रक्रिया आहे. तसेच सोशल नेटवर्कवर सुद्धा फोटो अपलोड करण्यासाठी फाईल साइज अमुक एक मर्यादेची असावी लागते.

तेव्हा तुम्ही कदाचित विचार केला असेल की एवढ्या सर्व फोटोंची फाईल साइज एका चुटकीसरशी कमी करता आली तर?
हो! हे शक्य आहे. आणि आज मी त्याबद्दलच सांगणार आहे.
 
यासाठी तुम्हाला माइक्रोसॉफ्टने त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध केलेले Image Resizer हे छोटेसे टूल डाउनलोड करावे लागेल. याची साइज आहे फक्त ५२१ केबी आणि वापरण्यास एकदम फुकट.

खाली दिलेल्या लिंकवरून प्रथम Image Resizer डाउनलोड करून घ्या.

आता ImageResizerPowertoySetup या नावाची झिप फाईल डाउनलोड होईल. ती extract करून किंवा त्यावर डबल क्लिक करून त्यामधील ImageResizerPowertoySetup ही सेटअप फाईल रन करा व खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे Install करा व पुढे वाचा.






















































इनस्टॉलेशन झाल्यानंतर आता तुम्हाला जे फोटो रिसाइज करायचे आहेत त्या फोल्डरमध्ये जा.
खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे सर्व फोटो सिलेक्ट करा व Right click करून Resize pictures वर क्लिक करा. (यात तुम्ही पाहु शकता की प्रत्येक फोटोची साइज जवळपास २ एमबी पर्यंत आहे.)












यानंतर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये Small (fits a 640 x 480 screen) हा पर्याय निवडा व OK या बटनावर क्लिक करा.































पहा आता त्याच फोल्डरमध्ये मूळ फोटो तसेच राहून त्याच फोटोंच्या नावाने नवीन फोटो तयार झालेले दिसतील. फक्त प्रत्येक फोटोच्या नावासमोर (small) असे लिहिलेले असेल व फाईल साइजदेखील कमी झालेली असेल.
हे फोटो आता तुम्ही आरामात ईमेल करू शकता किवा सोशल नेटवर्क मध्ये सहज अपलोड करू शकता.
हि टिप तुम्हाला कशी वाटली?
तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा