मंगळवार, १६ मार्च, २०१०

BullZip PDF Printer

तुम्ही कधी एखादी वर्डएक्स्सेलपावरपॉइण्ट किवा इतर कोणत्याही प्रकारची डॉक्यूमेंट PDF मध्ये प्रिंट केली आहेकाय? नाही.....?

पण आता मात्र तुम्ही तुमच्या डॉक्यूमेंटस् PDF मध्ये प्रिंट करू शकता. यासाठी तुम्हाला डाउनलोड करावा लागेल BullZip PDF प्रिंटर.
या प्रिंटरच्या शोधकर्त्यांनी तो वापरण्यासाठी एकदम फुकट ठेवला आहे.

खाली दिलेल्या लिंकवरुन तुम्ही तो डाउनलोड करू शकता.

डाउनलोड झाल्यावर इनस्टॉल करा.
कंट्रोल पॅनेलमध्ये जाऊन प्रिंटरमध्ये पाहिल्यास तिथे तुम्हाला आता BullZip PDF प्रिंटर add झालेला दिसेल.







 

आता उदा. एखादी वर्ड किंवा एक्स्सेल डॉक्यूमेंट ओपन करा  प्रिंट बटणावर क्लिक करा.
खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे BullZip PDF Printer सिलेक्ट करा.

 testdocumentprint

 bullzipprinterprint
 
OK बटणावर क्लिक केल्यानंतर अजुन एक डायलॉग बॉक्स ओपन होईलत्यात तुम्हाला प्रिंट फाइल कुठे सेव्ह करायची ते विचारण्यात येईल. त्यानंतर Save वर क्‍लिक करा. बस्स! एवढे केल्यानंतर PDF फाईल तय्यार.....






















या डायलॉग बॉक्स मध्ये अजुन काही पर्याय आहेत. ते आता आपण क्रमाने पाहुया.

. पहिला पर्याय आहे General
यामध्ये फाईल केवळ PDF मध्येच नव्हे तर इतरही प्रकारात प्रिंट करू शकता. उदा. bmp, eps, jpeg, pcx, png, ps tiff


दुसरा आहे Document tab
यात तुमचे किवा तुमच्या कॉम्प्युटरचे नाव तसेच डॉक्यूमेंटचे शीर्षक विषय टाइप करू शकता.






















. तिसरा पर्याय आहे Image tab
तुम्ही जर डॉक्यूमेंट इमेजमध्ये प्रिंट करत असाल तर अधिक तपशिल तुम्हाला या टॅब मध्ये मिळेल.
 . चौथा पर्याय आहे Watermark tab
यात डॉक्यूमेंटच्या Background  मध्ये तुम्हाला जर एखादी टेक्स्ट वॉटरमार्कच्या स्वरुपात हवी असेल तर हा पर्याय निवडा. 

. पाचवा पर्याय आहे Merge tab
समजा तुमच्याकडे एखादी PDF फाईल आहे त्यात तुम्हाला तुम्ही प्रिंट करत असलेली डॉक्यूमेंट जर समाविष्ट करायची आहे तर हा पर्याय निवडा.  























. सहावा पर्याय आहे Security
यात तुम्ही डॉक्यूमेंटला पासवर्ड देऊन सुरक्षित  करू शकता.























मी BullZip PDF Printer वापरुन पहिला आहे. यागोदर मी Adobe चा PDF Printer वापरत होतो. त्यामुळे मला BullZip PDF Printer ची अजुन दोन खास वैशिष्टे इथे नमूद करावीशी वाटतात.
. Adobe PDF Printer च्या तुलनेत हा जलद प्रिंट करतो.
. प्रिंट केलेल्या डॉक्यूमेंटची फाईल साइज इतर PDF Printer च्या तुलनेत कमी ठेवतो. यासाठी उदाहरण म्हणून मी एकच डॉक्यूमेंट Adobe PDF Printer BullZip PDF Printer हे दोन्ही प्रिंटर वापरुन प्रिंट केली. रिझल्ट तुम्ही खालील चित्रात पाहु शकता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा