सर्वाधिक स्पॅम आणि फ्रॉड ईमेल्स हे रशियामधून येतात हे जवळपास सर्वांनाच माहीत आहे.
यावर उपाय म्हणून रशियन सरकारने एक नवीन नियम काढला आहे.
१ एप्रिल २०१० पासून जे कोणी .ru
हे domain
रजिस्टर करतील त्यांना त्यांच्या पासवर्डची एक प्रत ओळख पडताळणीसाठी द्यावी लागेल.
.ru हे रशियातील उच्च पातळीचे domain
आहे;
जसे भारतात .in
हे उच्च पातळीचे domain
आहे.
रशियन सरकारला आशा आहे की या नवीन नियमामुळे .ru या domain वरुन पसरणारे स्पॅम, फ्रॉड यासारखे इंटरनेटवरील गैरप्रकार कमी होतील.
यापूर्वी .ru या domain वर रजिस्टर करताना ओळख पडताळणीची कोणतीही सुविधा नव्हती आणि याचा गैरफायदा घेऊन स्पॅमर व हॅकर आपली खरी ओळख लपवायचे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा