शनिवार, १३ मार्च, २०१०

विंडोज मीडिया प्लेयरमध्ये स्क्रीनशॉट कसा कॅपचर कराल?

तुम्ही कधी विंडोज मीडिया प्लेयर मध्ये विडीयो चालू असताना एखादा आवडलेला सीन कॅपचर करून तो पेंट-ब्रश किंवा तत्सम एखाद्या फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये पेस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे का? तर इतरांप्रमाणे तुमचादेखील हिरमोड झाला असेल. कारण पेस्ट केल्यानंतर विडीयोच्या जागी फक्त एका काळ्या चौकोनाव्यतिरिक्त तुमच्या हाती काहीच लागले नसेल. तुम्ही कदाचित पुन्हा प्रयत्न कराल पण शेवटी परिणाम तोच.

तसे पाहिल्यास विडीयो मधून एखादा स्क्रीन कॅपचर करण्यासाठी विशिष्ट प्रकारची कमर्शियल सॉफ्टवेअर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण त्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा किंवा एखादे सॉफ्टवेअर डाउनलोड करता ही समस्या सोडवता आली तर?

आजची टिप तुमची ही समस्या चुटकीसरशी सोडवेल.
ही समस्या दोन प्रकारे सोडवता येईल. दोन्ही प्रकार मी इथे सांगणार आहे.
पाहुया पहिला प्रकार Overlays

प्रथम विंडोज मीडिया प्लेयर ओपन करून Tools वर क्लिक करून नंतर Options वर क्लिक करा.
. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे Options मधील Performance टॅब ओपन करून Advanced वर क्लिक करा.



















 



. आता Video Acceleration Settings या नावाचा विंडो ओपन होईल.त्यामध्ये फक्त Use overlays च्या बाजूला असलेल्या छोट्या चौकोनातील टिक मार्क काढून टाका ओके वर क्लिक करुन तो विंडो बंद करा.





















बस्स! आता तुम्ही विंडोज मीडिया प्लेयरमध्ये विडीयो प्ले करून तुम्हाला हवा तो सीन कीबोर्डवरील Print Screen दाबून अक्ख्या डेस्कटॉपसक कॉपी करू शकता किंवा Alt + Print Screen दाबून फक्त विंडोज प्लेयरचा विंडो, विडीयोफ्रेमसक कॉपी करू शकता.























आता पाहुया दुसरा प्रकार.

यामध्ये Overlays काढून टाकता फक्त Video Acceleration काढून टाकून पहिल्या प्रकाराप्रमाणेच परिणाम साधता येईल.

मघाशी दाखविल्याप्रमाणे Options मधील Performance टॅब ओपन करा. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे
जिथे Video Acceleration लिहिले असेल तिथला स्लाइडर "Full" वरुन "none" वर आणून ठेवा ओके वर क्लिक करुन तो विंडो बंद करा.























मग झालेतर..
आता तुम्ही विंडोज मीडिया प्लेयरमध्ये स्क्रीनशॉट कॅपचर करू शकता.
ही टिप कशी वाटली? तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा