काही दिवसापूर्वी मी एका ठराविक आयकॉनच्या शोधत होतो. गूगलवर सर्च करून देखील मनासारखे icon काही मिळत नव्हते आणि आज अचानक काहीतरी सर्च करताना या वेबसाइटवर जाऊन पोहोचलो. या वेबसाइटचे नाव आहे www.findicons.com इथे चक्क icons चा खजिना आहे आणि या खजिन्यात आहेत जवळपास ३ लाख icons.
मी शोधत असलेले आयकॉन येथे मला मिळाले. तुम्हाला जर नेहमीच्या विंडोजच्या icons चा कंटाळा आला असेल तर या वेबसाइट वरुन तुमच्या पसंदीचे आयकॉन तुम्ही ICO, ICNS किवा PNG या फॉरमॅटमध्ये डाउनलोड करू शकता. उदा. मायकॉम्प्यूटरचे आयकॉन किंवा फोल्डर, प्रिंटर, वर्ड, एक्स्सेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे आयकॉन तुम्हाला येथे सापडेल. या वेबसाईटच्या निर्मात्यांचा दावा आहे की त्यांच्याइतका आयकॉनचा साठा जगात कुणाकडेच नाही आणि तोही फुकट.
मग तुम्ही स्वतः खात्री करुन घ्या आणि निवडा तुमच्या पसंदीचे आयकॉन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा