शनिवार, ६ मार्च, २०१०

एकापेक्षा अधिक जीमेल अकाउंट्स एकाच जीमेल अकाउंटवर

तुम्ही एकापेक्षा अधिक जीमेल अकाउंट्स वापरत असाल तर दरवेळी ईमेल चेक करताना प्रत्येक अकाउंटचा युजरनेम आणि पासवर्ड लक्षात ठेवण हि एक कटकट होऊन बसते.
पण तुम्हाला एकाच जीमेल अकाउंट वर तुम्ही वापरत असलेली इतर जीमेल अकाउंटची ईमेल वाचता आली तर?

मग चलातर पाहुया हि ट्रिक.

समजा उदाहरणार्थ तुम्ही खाली दिलेली जीमेल अकाउंट्स वापरत आहात.
1. Jhon@gmail.com (प्राथमिक)
2. Jhon-Office@gmail.com (दुय्यम)
3. Jhon-Business@gmail.com (दुय्यम)

आता तुम्हाला ही तीनहि अकाउंट्स तुमच्या प्राथमिक जिमेल अकाउंट Jhon@gmail.com वर मॅनेज करायची आहेत तर खाली दिलेल्या स्टेप्स पाळा.

. सर्वप्रथम तुमच्या इतर (दुय्यम) जीमेल अकाउंट वर Login करा जिथून तुम्हाला तुम्हाला तुमची ईमेल्स तुमच्या प्राथमिक जीमेल अकाउंटवर (Jhon@gmail.com) फॉरवर्ड करायची आहेत.

. Login केल्यानंतर खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे Settings वर क्लिक करा.







. आता Settings पेज मध्ये "Forwarding and Pop/IMAP" वर क्लिक करून तुमचा प्राथमिक जीमेल अकाउंट पत्ता  "forwarding text box" मध्ये टाइप करा.
असे केल्याने दुय्यम जीमेल अकाउंट्स वरील ईमेल्स तुमच्या प्राथमिक जीमेल अकाउंटवर (Jhon@gmail.com) फॉरवर्ड केली जातील.







. आता तुमच्या प्राथमिक जीमेल अकाउंटवर (Jhon@gmail.com) Login करून खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे “Labs” icon वर क्लिक करा.







. क्लिक केल्यानंतर Gmail Labs page ओपन होईलत्यामध्ये "Multiple Inboxes” हे Lab application शोधा  चित्रात दाखविल्याप्रमाणे "Enable" वर क्लिक करून  Gmail Labs page च्या तळाशी असलेल्या “Save changes” वर क्लिक करा.






. असे केल्याने "Multiple Inboxes” हे Lab application तुमच्या settings page वर समाविष्ट केले जाईलआता पुन्हा "settings" वर क्लिक करा.

. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे “Multiple inboxes” वर क्लिक करा.











. आता “pane-0” मध्ये तुमचा पहिला दुय्यम जीमेल अकाउंट
(Jhon-Office@gmail.comटाइप करा आणि “Pane-1” मध्ये दुसरा दुय्यम जीमेल अकाउंट
( Jhon-Business@gmail.comटाइप करा.
"Extra panel positioning" मध्ये "Right side of the inbox" वर क्लिक करून "Save changes" वर क्‍लिक करा.


. यानंतर तुमचा inbox ओपन करा. तुम्हाला उजव्या बाजूला वरील बाजूस दोन नवीन शाखा दिसतील. ते आहेत तुमचे दुय्यम जीमेल अकाउंटचे inbox.
आता जेव्हा जेव्हा तुमच्या दुय्यम जीमेल अकाउंट्सवर ईमेल्स येतील तेव्हा त्याची एक प्रत तुमच्या प्राथमिक जीमेल अकाउंटवर पाठवली जाईल मूळ प्रत दुय्यम जीमेल अकाउंटवर वर save केली जाईल.










आता तुम्ही एकाच जीमेल अकाउंटवर इतर जीमेल अकाउंट्सवरील सर्व ईमेल्स एकाचवेळी पाहू शकता. हि ट्रिक तुमचा बराच वेळ वाचविल यात शंकाच नाही.
दरवेळी इतर जीमेल अकाउंट्सवर Login आणि Logout करायची कटकट आता कायमची bye bye!

मग कशी वाटली हि ट्रिक?
तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा.

हा लेख PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी PDF Icon वर क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा