बुधवार, ३ मार्च, २०१०

सुवर्णसंधी

प्रस्तुत लेख दैनिक लोकसत्ता मधून जशास तसा घेतला आहे.
 दि. ०३ मार्च २०१०



*World gold Council च्या मते जगातील सोन्याच्या सुमारे १०% म्हणजेच जवळजवळ १५,००० टन सोने भारतात आहे. २००८ साली भारतातील सोन्याचा वापर ६७५ टन होता. सोन्याच्या उपभोगामध्ये चीन हा भारताचा नजीकचा स्पर्धक समजला जातो. सन २००८ वरून ऑगस्ट २००९ पर्यंत जगात मंदी असूनही भारतातील सोन्याची आयात २१.८% वधारली  असे मत नुकतेच Bombay bullian association च्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.
जगातील सर्व सुवर्ण खाणींमधून आतापावेतो १ लाख ४५ हजार टन सोने काढण्यात आले आहे. अजून अधिकात अधिक १ लाख टन सोने खाणीमधून काढणे शक्य आहे. मात्र त्यानंतर पुढील ५० वर्षांत सोन्याचे नैसर्गिक साठे संपुष्टात येतील.
*सध्या भारतात कोलार येथे ‘कोलार गोल्ड फिल्ड’, तसेच कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात ‘हत्ती गोल्ड फिल्ड’ तर आंध्र प्रदेशात आनंदपूर जिल्ह्यात ‘रामगिरी गोल्ड फिल्ड’ अशा तीन ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत. १ एप्रिल २००५ रोजी देशात ३९०.२१ दशलक्ष टन सोन्याचे साठे असावेत असा अंदाज UNFC ने व्यक्त केलेला होता. सोन्याच्या उपभोगातील वाढ सेन्सेक्सच्या वाढीलाही मागे टाकणारी आहे.
*२००८ या सालात भारतात सेन्सेक्सची घसरण ५०% नी झाली. मात्र याच काळात सोने २९% नी वधारले होते. सोन्याची मागणी याच वर्षांत ४०० टनांनी वाढत चालली होती. नोव्हें. २००८ मध्ये भारतात प्रति औंस सोन्याची मागणी ३४,८३४.९६ औंस तीच मार्च २००९ पर्यंत ४९,४३७.९५ औंसपर्यंत वाढली इतकेच नव्हे तर सप्टें. २००९ पर्यंत सोन्याची मागणी सरासरी ४८ हजार राहिली.

ग्लोबलायझेशन- गोल्ड अ‍ॅन अपॉच्र्युनिटी असे उच्चारताना गोल्डन अपॉच्र्यनिटी असा अपभ्रंश होतो आणि खरेच असे वाटू लागते की, भारतीयांना जागतिकीकरणाने सोन्याच्या रुपाने एक सुवर्णसंधीच प्रदान केली आहे. कारण सोन्याचा सर्वात मोठा उपभोक्ता देश बनण्याकडे भारताची वाटचाल अतिशय वेगाने सुरू झाली आहे. जागतिकीकरणाने सोन्याच्या रुपात कशा संधी मिळाल्या आहेत हे सोन्याचा इतिहास पाहिल्यावर लक्षात येईल.
अगदी सुरुवातीला अर्थव्यवस्थेत वस्तुविनिमय पद्धती अस्तित्वात होती. त्यातून बऱ्याच समस्या निर्माण होत होत्या. व्यवहार करणे कठीण होऊ लागले आणि यातूनच धातू रुपी नाण्यांचा म्हणजेच पैशाचा महाभयानक (पैशासाठी आणि पैशामुळे आजकाल जे घडते त्यावरून महाभयानक हा शब्दही कमीच वाटेल.) शोध लावला आणि धातूयुग उदयाला आले. म्हणूनच ‘अग्नी आणि चक्रानंतर मानवाने लावलेला तिसरा महत्त्वाचा शोध म्हणजे पैसा होय’ असे म्हटले जाते. धातूची नाणी अस्तित्वात आली. त्यावेळी सोन्यापेक्षाही इतर धातूंना अधिक मौल्यवान समजले जात होते. त्या कालखंडात युरोपमधील एक राजा अ‍ॅल्युमिनियमच्या ताटात गर्वाने जेवत होता तर त्याच वेळी त्याचे सरदार सोन्या-चांदीच्या खाली माना घालून जेवत होते. काही कालावधीनंतर मात्र सोन्यामधील गुण प्रकाशात येऊ लागले. सोन्याची चकाकी, दुर्मिळता, लवचिकता, धातूचा नरमपणा इतकेच नव्हे तर सोने या धातूवर अग्नी, जल, वायू आणि बहुतांश धातूंना वितळवणाऱ्या ‘आम्लराज’ नायट्रीक अ‍ॅसिडचाही कोणताच परिणाम होऊ शकत नाही म्हणून सोने हा मौल्यवान धातू बनला आहे. झळाळी प्राप्त झाली आहे.
भारत या देशाचा उल्लेख ‘सोने की चिडीया’ असा गर्वाने केला जात होता. अगदी महंमद गझनी याने सतरा वेळा भारताला लुटून जहाजे भरभरून सोने जरी नेले असले तरी, कारण भारतात त्याकाळी खरोखरच सोन्याचा धूर निघत होता. शेकडो वर्षे परकीय सत्तांनी आणि राजांनी भारतावर स्वाऱ्या करून सोने लुटून नेल्याच्या घटना इतिहासाने जतन करून ठेवल्या आहेत. विदेशी लुटारू भारताचा उल्लेख ‘सोने गिळंकृत करणारी तळ नसलेली विहीर’ असा करीत. कारण सोन्याचे प्रचंड उत्पादन आणि उपयोग आमच्याच देशात घेतला जात होता.
१८०१ पर्यंत दर शंभर वर्षांत भारतात सरासरी ३५ ते ४० टन सोने आयात केले जात होते, मात्र १८०१ ते १९०१ या शंभर वर्षांत भारतात जवळजवळ ३७०० टन सोन्याची आयात करण्यात आली. याशिवाय इतर मार्गानी येणारे सोने वेगळेच. १९७० पर्यंत अंदाजे ७० लाख तोळे सोन्याचे प्रतिवर्ष स्मगलिंग भारतीयांसाठी केले जात होते, अशी एक आकडेवारी सांगते. कारण सोने म्हणजे भारतीयांसाठी फक्त एक आर्थिक गुंतवणूक नव्हती तर एक भावनिक गुंतवणूक बनली होती. कोणतेही लग्न, सण, समारंभ सोन्याच्या खरेदीशिवाय भारतीयांचा साजराच होत नव्हता. भारतातील सोन्याची ही प्रचंड वाढती मागणी लक्षात घेता सरकारने यात लक्ष न घातले तरच नवल, त्यावेळी भारताची सोन्याची साठवण ही देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या १/३ होती.  World gold Council   च्या मते जगातील सोन्याच्या सुमारे १०% म्हणजेच जवळजवळ १५,००० टन सोने भारतात आहे. २००८ साली भारतातील सोन्याचा वापर ६७५ टन होता. सोन्याच्या उपभोगामध्ये चीन हा भारताचा नजीकचा स्पर्धक समजला जातो. सन २००८ वरून ऑगस्ट २००९ पर्यंत जगात मंदी असूनही भारतातील सोन्याची आयात वधारून ती २१.८% झाली असे मत नुकतेच Bombay bullion association च्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ बनली आहे. मात्र भारतासारख्या सोन्याच्या प्रमुख उपभोक्ता देशाला आपल्या मागणीसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागत आहे ही एक चिंतेची बाब आहे.
जगातील सर्व सुवर्ण खाणींमधून आतापावेतो १ लाख ४५ हजार टन सोने काढण्यात आले आहे. अजून अधिकात अधिक १ लाख टन सोने खाणीमधून काढणे शक्य आहे. मात्र त्यानंतर पुढील ५० वर्षांत सोन्याचे नैसर्गिक साठे संपुष्टात येतील. सध्या जगात दक्षिण आफ्रिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया सोन्याचे प्रमुख उत्पादक देश असून तेथील खाणीमध्ये अजूनही सोन्याचे साठे शिल्लक आहेत. सोन्याच्या या प्रमुख पुरवठादार देशातही सोन्याचे उत्पादन कमी होत आहे. भारतातील सुवर्ण साठे मात्र वेगाने घटत चालले आहेत. सध्या भारतात कोलार येथे ‘कोलार गोल्ड फिल्ड’, तसेच कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात ‘हत्ती गोल्ड फिल्ड’ तर आंध्र प्रदेशात आनंदपूर जिल्ह्यात ‘रामगिरी गोल्ड फिल्ड’ अशा तीन ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत. १ एप्रिल २००५ रोजी देशात ३९०.२१ दशलक्ष टन सोन्याचे साठे असावेत असा अंदाज UNFC ने व्यक्त केलेला होता. सोन्याच्या उपभोगातील वाढ सेन्सेक्सच्या वाढीलाही मागे टाकणारी आहे.
अर्थशास्त्रीय परिभाषेत कोणत्याही वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या संतुलनानेच ठरते. तशीच सोन्यालाही किंमत प्राप्त होते. १९ व्या शतकापर्यंत सोने हे वस्तुविनिमयाचे साधन होते आणि US$  चे मूल्यही सोन्याच्या किंमतीशी सलग्न होते. मात्र १२ सप्टें. १९८९ पासून आजतागायत सुवर्णाची किंमत ‘लंडन गोल्ड फिक्स’मध्ये ठरत आली आहे. ‘लंडन गोल्ड पुल’चे पाच सदस्य असतात जे दिवसातून दोन वेळा, सकाळी १०.३० वा. व दुपारी ३.०० वा. सुवर्ण किंमत त्यावेळच्या मागणी आणि पुरवठय़ातून निश्चित करीत असतात. भारतात मुंबई, दिल्ली व कोलकाता येथे सुवर्णाचे हजर बाजार (Spot Market) आहेत जे लंडनमधील किंमतीशी संबंधित असतात. सोन्याची किंमत औंस या वजनी मापात निश्चित केली जाते. ९१ औंस = २८.३५ ग्रॅम सोने) भारतात स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, कॉर्पोरेशन बँक आणि बँक ऑफ नोव्हा स्कॉयिया यासारख्या १० ते १२ बँका सोने आयातीत अग्रेसर आहेत, इतकेच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी RBI ने २०० टन सोन्याचा साठा (IMF ने लिलावात काढलेल्या ४०० टन सोन्यापैकी) खरेदी केला आहे, तो भारतीयांचा वाढता उपयोग लक्षात घेऊनच पण याला इतरही काही कारणे आहेत. त्यांची चर्चा पुढे ओघाने होईलच. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती US$ मध्ये नमूद केल्या जातात. त्यामुळे डॉलर आणि रुपयाच्या मुल्ल्यात होणाऱ्या बदलाचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामुळे डॉलरची आणि डॉलरमुळे सोन्याची चलती निर्माण झाली आहे.
सद्यस्थितीत सोने हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय बनत चालला आहे. सोन्यातील गुंतवणुकीत सुरक्षितताही आहे. कारण सोन्याचा भाव जवळपास १७% ते २१% नी वधारतो आहे. अशावेळी गुंतवणुकदारांनी काय करावे हा प्रश्न उभा राहातो. सोन्याच्या वाढत्या झळाळीचा लाभ घ्यावा का? आहे ते सोने वाढीव किंमतीला विकावे का? वाट पाहावी, की आताच्या किंमतीला सोने गुंतवणूक म्हणून खरेदी करावे व भविष्यात वाढत्या किंमतीला विकून नफा कमवावा हे ज्याचे त्याने ठरवायचे. अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून एवढे मात्र नक्की सांगू शकतो. सोन्याचा उपयोग (मागणी) वाढत चालली आहे आणि सोन्याचे उत्पादन (पुरवठा) मर्यादित बनत चालले आहे. त्यामुळे भविष्यात सोन्याला चांगली झळाळी प्राप्त होणार याच शंकाच नाही. मात्र RBI  ने खरेदी केलला २०० टन सोन्याचा साठा बाजारात बाहेर काढल्यावर त्याचा काय परिणाम होतो. हे काही कालावधीतच समजेल. अर्थव्यवस्थेत जेव्हा चलनवाढ होते तेव्हा चलनी नोटांचे मूल्य घटत जाते आणि चलनाची विश्वासार्हता कमी होऊ लागते. वर डॉलरच्या बाबतीत हेच होऊ लागले आहे. पण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरला पौंड, युरो, येन, युआन ही चलने टक्कर देत आहेत. ज्यावेळी चलनामध्ये अनिश्चितता येते तेव्हा गुंतवणुकीसाठी मौल्यवान धातूंचे पर्याय स्वीकारले जातात. RBI  ने केलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याची खरेदी याच कारणाने आहे जर वर डॉलरमध्ये रुपया गुंतवला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी येऊन रुपया वधारल्यास करोडो रुपयांचे नुकसान होऊ शकते म्हणून सोने खरेदी करण्यात आले. सोन्याच्या किंमती वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे RBI  चलनाची तूट भरून काढण्यासाठी नोटांची छपाई करू शकते तसे सोन्याची छपाई किंवा उत्पादन घेता येत नाही. किंबहुना अजूनतरी जगातल्या कोणत्याच मध्यवर्ती बँकेला हे शक्य झाले नाही.
२००८ या सालात भारतात सेन्सेक्सची घसरण ५०% नी झाली. मात्र याच काळात सोने २९% नी वधारले होते. सोन्याची मागणी याच वर्षांत ४०० टनांनी वाढत चालली होती. नोव्हें. २००८ मध्ये भारतात प्रति औंस सोन्याची मागणी ३४,८३४.९६ औंस तीच मार्च २००९ पर्यंत ४९,४३७.९५ औंसपर्यंत वाढली इतकेच नव्हे तर सप्टें. २००९ पर्यंत सोन्याची मागणी सरासरी ४८ हजार राहिली. भारतीयांच्या सोन्याच्या लालसेचा विचार भारतीयांनीच योग्य गुंतवणुकीसाठी केला पाहिजे. कारण अनिश्चिततेच्या काळात सोने हे गुंतवणूक विमा म्हणून उपयोगी येऊ शकते. कदाचित भविष्यात दुकानदार चलनी नोटांऐवजी सोनेच स्वीकारू लागतील आणि पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेत सुवर्णचलनमान पद्धती अस्तित्वात येईल, का? कारण History Repeats Again तेव्हा जागतिकीकरणात बदललेल्या अर्थव्यवस्थेत या सुवर्णसंधीचा लाभ गुंतवणुकीतून नक्कीच उठवला पाहिजे आणि ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून दिले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा