बुधवार, १० मार्च, २०१०

RIOT एक दर्जेदार ईमेज कोंप्रेसिंग टूल.

आतापर्यंत तुम्ही अनेक ईमेज कोंप्रेसिंग सॉफ्टवे वापरले असतील (किवा नसतीलहि). पण आज मी तुम्हाला एका नवीन ईमेज कोंप्रेसिंग टूलची माहिती करून देणार आहे. ह्या सॉफ्टवेअरचे खास वैशिष्ट म्हणजे इमेज फाइलची फक्त साईझ निम्मी (५०%) करते पण दर्जा मात्र ७५% राखते.

मग चलातर पाहुया हे कसे शक्य आहे ते.

या सॉफ्टवेअरचे नाव आहे RIOT (Radical Image Optimization Tool )
सॉफ्टवेअर फुकट आहे आणि डाउनलोड साईझ आहे फक्त MB.

1.  सर्वप्रथम हे सॉफ्टवेअर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्या.
http://luci.criosweb.ro/riot/

. डाउनलोड झालेली झिप फाईल अनझिप करून सेट-अप रन करा.


















३. इनस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर आता प्रोग्रॅम रन करा. इमेज कॉम्प्रेशन सुरू करण्यासाठी जी इमेज कॉम्प्रे करायची आहे ती आता ओपन करा. तुम्हाला RIOT ताबडतोब तुम्ही निवडलेली इमेज दोन वेगवेगळ्या स्क्रीनवर दाखवे. यातल्या डाव्या स्क्रीनवर मूळ इमेज उजव्या स्क्रीनवर कॉम्प्रे केलेली इमेज दिसेल.
त्याखाली RIOT इमेज कॉम्प्रे करण्यासाठी इमेजचा दर्जा (Quality) ठरविण्यासाठी एक पर्याय देईल. तो असेल ७५%. तुम्ही हा पर्याय ७५ टक्क्यापासून तो ३०% इतका कमी करू शकता. पण RIOT ने सुचविलेला ७५% हा पर्याय शक्यतो तसाच ठेवा. यानंतर पहा आता फरक. कॉम्प्रे झालेल्या इमेजच्या दर्जामध्ये तुम्हाला क्वचितच फरक आढळेल. पण तुम्ही एक लक्षात घेतल आहे का? तुमच्या इमेज फाईलची साइज आता जवळपास निम्मी आहे.

खालील चित्रात दाखविलेली मूळ इमेज हि ३०७२ X २०३८ पिक्सेल ची आहे आणि कॉम्प्रेशन नंतर तिची साइज जवळपास निम्मी झाली आहे. पण दर्जा मात्र हुबेहुब मूळ इमेज इतकाच दिसेल, जो आहे खरेतर ७५%.



ह्याच इमेजचा दर्जा ३०% इतका कमी करून देखील पाहिला आहे. फाईल साइज फक्त २०० केबी ने कमी झाली पण दर्जामात्र मूळ इमेज इतकाच सुस्पष्ट राहिला.

 मग हे सॉफ्टवेअर टूल ट्राय करून पाहणार का?
तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा