टास्कबार वरील डेस्कटॉप आयकॉन हरवलाय आणि तुम्हाला तो परत मिळवता येत नाही म्हणून तुम्ही त्रस्त आहात? मग हि टिप तुमचा त्रास नक्कीच दूर करेल.
सर्वप्रथम नोटपॅड ओपन करा (ते कुठून ओपन करायचे ते तुम्हाला ठाऊक असेल असे गृहीत धरतो)
त्यामध्ये खालील कोड टाइप करा व फाईल Show Desktop.scf या नावाने सेव्ह करा.
[Shell]
Command=2
IconFile=explorer.exe,3
[Taskbar]
Command=ToggleDesktop
सेव्ह करताना ती C:\Documents and Settings\username\Application Data\ Microsoft\Internet Explorer\ Quick Launch या फोल्डर मध्ये सेव्ह करा. फक्त username च्या जागी तुमचे युजर अकाउंट नेम टाइप करा.
एवढे केल्यानंतर आता तुम्हाला टास्कबारमध्ये पुन्हा डेस्कटॉप आयकॉन दिसू लागेल. नोटपॅड आता बंद करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा